कर्जत:चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पुलामुळे घरात घुसले पाणी.


कर्जत / सुभाष माळवे
कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील दलित वस्तीत राहत असलेल्या दशरथ केरा सरोदे, दादा केरा सरोदे  झुंबर केरा सरोदे, किसन केरा सरोदे, नवनाथ केरा सरोदे.याच्या घरात चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पुलामुळे घरात घुसले पाणी. 
   याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चालू असलेल्या वडगाव ते नांदगाव या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे. वडगाव गावाच्या गावठाण हद्दीत सरोदे कुटूंबीय गाव ओढयाच्या शेजारी स्वता:च्या जमिनीवर फार पूर्वी पासून राहतात. सरोदे कुटूंबीय च्या घरात समोरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गावओढयावर पुल बांधण्यात आला आहे. हा पुल रूंदी
 व लांबीने कमी असून रस्त्याच्या कडेला चारी न खोदल्याने पावसाचे पाणी या पुलाखाली पाईप मध्ये बसत नाही त्यामुळे पाणी हे सरोदे कुटूंबीय च्या घरात शिरत आहे. या पाण्याने सरोदे कुटूंबीय चे संसार उपयोगी व अनं धान्य सह पाण्यात भिजले. याची दखल ना ग्रामपंचायती पासून महसुल व बांधकाम आणि जिल्हा परिषद ने  घेतल्याने सरोदे कुटूंबीय अतिशय हतबल झाले असून सतत च्या पावसाने त्याच्या घराची व शेताची पुरती वाट लागली आहे. 


 रस्ता डांबरी करण काम निकृष्ट रोहित पवार यांच्या कडे तक्रार

वडगाव ते नांदगाव या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजने अंतर्गत चालू असून  हे काम अत्यंत निकृष्ट चालू असून या कामाची तक्रार करून ही कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आमदार रोहित दादा पवार यांच्या कडे ही तक्रार करण्यात आली आहे. आणखी एकदा समक्ष रोहित पवार यांची भेट घेऊन पुन्हा एकदा तक्रार करणार आहे. 

नवनाथ तनपुरे
ग्रामपंचायत सदस्य 

भरपाई मिळावी

अधिकारी याच्या चुकीच्या कामामुळे आमचे घराचे व शेताचे  पाण्याने प्रचंड नुकसान झाले आहे. चुकीच्या पद्धतीने पुलाचे काम केले आहे. पुलाच्या कडेला पूर्वीची चारी होती ती पुन्हा तशी चारी करण्यात यावी व 
नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी व आमच्या सरोदे कुटूंबाची मदत करावी. अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल

किसन सरोदे
पिडीत.

Post a Comment

Previous Post Next Post