कर्जत : पिकाचे सरसकट पंचनामे करीत नुकसान भरपाई द्यावी- रवींद्र सुपेकर


कर्जत /सुभाष माळवे कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मुग पिकाचे सरसकट पंचनामे करीत नुकसान भरपाई द्यावी यासह शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खतांचा मुबलक पुरवठा करण्यात यावा या आशयाचे निवेदन शुक्रवारी कर्जत मनसेच्यावतीने प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना देण्यात आले . कर्जत तालुक्यात यंदा अतिरिक्त पाऊस झाल्याच्या कारणाने मुग पिकावर रोग पडला आहे . त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . निसर्गाच्या अनियमित खेळामुळे व अतिरिक्त पावसाच्या कारणाने मुग पिकाची पाने पिवळी पडली आहेत . त्यामुळे सदरचे पीक वाया गेले असून शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत . त्यामुळे मुग पिकांचे सरसकट पंचनामे करीत त्याची नुकसान भरपाई द्यावी . यासह सध्या कर्जत तालुक्यात युरिया आणि इतर खताचा मोठा तुटवडा जाणवत आहे . तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून खतांसाठी कृषी सेवा केंद्रापुढे रांगा लावत दिवस - दिवस ताटकळत थांबावे लागत आहे . पिकांच्या पोषणासाठी खतांची आवश्यकता असून तुटवड्या अभावी पिके जळून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . त्यामुळे सुद्धा शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून खताची टंचाई निर्माण होणार नाही या विषयी उपाय योजना करावी या आशयाचे निवेदन मनसेचे कर्जत तालुकाध्यक्ष रवींद्र सुपेकर यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना दिले आहे . यावेळी शहराध्यक्ष नामदेव थोरात , प्रसाद मैड , सूर्यकांत कोरे , आबासाहेब उघडे , सचिन सटाले , विशाल भुसारे , राजू धोत्रे , योगेश थोरात आदी उपस्थित होते . नुकसान भरपाई मिळावी कर्जत तालुक्यातील अनेक गावात पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांन सरकारने मदत करावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल रविंद्र सुपेकर तालुका अध्यक्ष मनसे

Post a Comment

Previous Post Next Post