राशीन येथील तोतया पी. एम. ओ. कार्यालयाचा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ताब्यात : कर्जत पोलिसांची कारवाई

राशीन येथील तोतया   पी. एम. ओ. कार्यालयाचा एक्झिक्युटिव्ह अफिसर  ताब्यात :  कर्जत पोलिसांची कारवाई


कर्जत सुभाष माळवे

कर्जत तालुक्यातील राशीन येथील मुळचा रहिवासी असलेला तोतया पंतप्रधान कार्यालयात एक्झिक्युटिव्ह अधिकारी असल्याची बतावणी करत असलेल्या इसमाला ताब्यात घेण्यास बुधवा पोलिसांना  (ता.१०) यश आले आहे.  
 या तोतया ने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना जवळीक साधण्यासाठी आपण पंतप्रधान कार्यालयात सिनियर एक्झिक्युटिव्ह अफिसर पदावर कार्यरत असून आपणास काही मदत किंवा पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही बदली करून देतो असे सांगून दबाव टाकत होता या तोतया ने दोन तीन महिने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सतत वावर होता . या तोतया च्या पुढे पुढे करण्यात सातव यांची दमछाक झाली. सतत च्या वैताग सातव यांना सहन करावा लागत होता. एके दिवशी राशीन येथील काही इसम सातव याच्या कडे कामानिमित्त आले असता हा तोतया सातव याच्या पुढे बसलेला होता. त्याच्या समोर राशीन येथील लोकांना बोलता येईना मग त्यांनीच या तोतया चा
 भांडाफोड केला मग सातव यांनी पोलीस
 निरीक्षक सुनील गायकवाड यांना  8/6/20 रोजी या तोतया ची चौकशी करण्याचा आदेश दिला पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन दिवस चौकशी केली असता हा तोतया योगेंद्र उपेंद्र सांगळे हा युपीएससी परिक्षा पास झाला नसून तो कोणत्याही शासकीय नोकरीत कार्यरत नसल्याने त्याच्या विरूद्ध पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद देऊन त्याच्या वर गुरनं  412 / 2020 भादंवि 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे करत आहेत.  

दोन तीन महिन्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात या तोतया चा राबता होता मग दोन तीन महिने पोलीस, पोलीस निरीक्षक व स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कसे कळले नाही की हा तोतया आहे. फिर्याद ही पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी का दिली याचाही तपशील मिळणे आवश्यक आहे. 

पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास कनिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या कडून करणे योग्य आहे का आज पर्यंत कर्जत तालुक्यात अशी घटना घडली नाही मग या प्रकारात का घडली याचाही तपास होणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post