कर्जत शहरातील नामवंत डाॅ विलास काकडे याचे आज पहाटे निधन


कर्जत / सुभाष माळवे 
कर्जत शहरातील नामवंत डाॅ विलास काकडे याचे आज पहाटे निधन झाले. डॉ काकडे यांना कोरोना विषाणू ची लागण झाली होती. कोरोना पाॅझीटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. 
पंरतु त्यांची पहाटे  प्राण ज्योत मालवली . 
  कर्जत येथील एक प्रसिद्ध व लोकप्रिय डाॅ म्हणून ते सुपरिचित होते. डाॅ काकडे यांना बाबा या टोपणनावाने ओळखले जात असे. 
 कर्जत शहरावर डाॅ काकडे याच्या निधनाने शोककळा पसरली आहे. डाॅ काकडे याचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव होते. त्याच्या निधनाने कर्जत शहरात पोकळी निर्माण झाली आहे. 
डाॅ काकडे यांना सर्व डाॅक्टर, मेडिकल, लॅबोरेटरी व कर्जत शहरा तील अनेक लोकांनी दुख: व्यक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post