कर्जत शहरात महिलांनकडून नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी


कर्जत
सोनार समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ८२७ वी जयंती श्रावण शुद्ध नवमी या तिथीनुसार कर्जत शहरातील गदादे नगर मधील निर्मला मैड याच्या घरी साजरी
 करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम झाला .  श्री संत नरहरी महाराज याच्या प्रतिमेल  जेष्ठ महिला उषा कुलथे व कमल शहाणे याच्या हस्ते विधीवत पूजन व 
पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व उपस्थित सर्व महिलांनी श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.    व प्रसादाचे वाटप केले. यावेळी सामाजिक अंतर ठेवून सर्व कार्यक्रम घेण्यात आले .याप्रसंगी  सुवर्णकार महिला बचतगट संस्थापक  जयश्री कुलथे  , अध्यक्षा वर्षा कुलथे, सचिव शिल्पा माळवे, निर्मला मैड, वैशाली माळवे, गोजर टाक, अलका माळवे, सरला शहाणे, कोमल मिसाळ, शिवानी शहाणे, मंदा बुराडे आदी हजर होत्या. 
यावेळी जयश्री कुलथे यांनी सुवर्णकार महिला बचत गट हा समाजातील महिलांच्या उन्नती साठी स्थापन केला असून या पुढील काळात समाजातील महिला च्या हितासाठी काम करायचे आहे असे विषाद केले. शेवटी शिल्पा माळवे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post