१०० वर्षांची परंपरा असलेली कोरेश्वर महाराजांची रथयात्रा अखेर रद्द.

१०० वर्षांची परंपरा असलेली कोरेश्वर महाराजांची रथयात्रा अखेर रद्द.

सध्या जगभरच कोरोनाने धुमाकूळ घातला असून याचा फटका संपूर्ण जनजीवनावर झाला आहे.
१०० वर्षांपासून चालत आलेली कोरेगाव चे ग्रामदैवत
कोरेश्वर महाराजांची रथयात्रा दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त भरत असते. लाखो भाविक या यात्रेसाठी लांबून येतात. महाराजांचा रथ सकाळी स्वच्छ धुवून, हाराने सजवून पूर्ण गावात मिरवला जातो. भाविक भक्त या रथाच्या पाया पडतात आणि रथाला तोरण बांधतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ही रथयात्रा रद्द झाली आहे.
दिनांक २,३ आणि ४ ऑगस्ट रोजी कोरेगाव मध्ये कडक जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.मंदिर या तीन ही दिवस पूर्ण बंद राहणार आहे. अशी माहिती आज झालेल्या यात्रा कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आली. 
यावेळी सरपंच काकासाहेब शेळके यात्रा कमिटी अध्यक्ष अरुणराव फाळके ,शिवाजीआप्पा फाळके, एकनाथ शेळके, चंदकांत देशमाने, हनुमंत आबा शेळके, बापू शेळके, पोलीस पाटील  श्रीकांत फाळके   उपसरपंच दत्तात्रय देवकर ग्रामपंचायत सदस्य गंगासिंग परदेशी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post