भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पदी प्रशांत अडसूळ यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पदी प्रशांत अडसूळ यांची निवड

लहानपणापासून अभ्यासाची आवड असलेला, संयमी,शांत आणि चिकाटी असणारा मुलगा, अगदी विद्यार्थी दशेत असताना तेव्हापासून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवून देणारा, सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणारा प्रशांत अडसूळ यांचं कार्य पाहून भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या यादीत विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड केली.
प्रशांत अडसूळ कोरेगाव चे रहिवासी असून एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.विद्यार्थी दशेत सवंगड्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी शालेय स्तरावर अनेक उपक्रम राबवत होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शालेय स्तरावर अनेक कामे केली.त्याचबरोबर पत्रकारितेची आवड सुद्धा जोपासत होते.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी मजुरांच्या मुलांना मोबाईल मिळावेत यासाठी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. अशी अनेक कामे करत असताना भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कामांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा म्हणून विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष पद दिले.
यावेळी निवड झाल्यानंतर माजी मंत्री ना. प्रा. राम शिंदे, प्रसाद ढोकरीकर,नामदेव राऊत, ज्ञानदेव लष्कर, रामदास हजारे, डॉ. सुनील गावडे यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले आणि पप्पू शेठ धोदाड यांनी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post