अंबिजळगाव मध्ये आ रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची घेतली बैठक,..


कर्जत (प्रतिनिधी):-दिलीप अनारसे.२२/जुलै/--- कुकडीचा पाणी प्रश्न, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती, आदींसह शेतीच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आ. रोहित पवार यांनी अंबिजळगाव .खातगाव येथेल  श्री स्वामी समर्थ मंदीर  येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली व चर्चा केली. यावेळी अंबिजळगावचे सरपंच विलास आप्पा निकत,   कर्जत पंचायतचे माजी सभापती नानासाहेब निकत ,डॉ . राजेद्र  पाटील.प्रहार संघटनेच्या महीला जिल्हा अध्यक्षा सौ.विमलताई अनारसे .प्रहारचे तालुका अध्यक्ष  सुदाम निकत. सागर निकत , मा.प्राचार्य दत्ता भांडवलकर,खातगाव  ग्रामपंचायतचे सरपंच आश्विन आटोळे.मा.सरपंच चंद्रकांत आटोळे.विश्वास वाघ. अंबिजळगावचे पोलीस पाटिल बिभीषन अनारसे,दिलीप जाधव ,बबन रासकर. अनिल अनारसे.अनिल निकत .डॉ .संदिप बळे. बाळासाहेब लोंढे.बाबा मेजर लोंढे . तालुका कृषी अधिकारी दीपक  सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, अशोक सोनवणे, व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. रोहित पवार यांनी कुकडीच्या विविध प्रश्नावर चर्चा करताना लवकरच आपल्या भागातील शेतीतील क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल यासाठी आगामी काळात विविध कार्यशाळा घेणार असून, मत्स्यशेती बाबतही सर्वांना माहिती होण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post