Breking News राज्यभरातील आजच्या महत्वाच्या बातम्या..



जुलै २०१७ ते जानेवारी २०२० या काळात जीएसटी विवरणपत्र न भरलेल्या करदात्यांकडून कोणतंही विलंब शुल्क न आकारण्याचा  जीएसटी परिषदेत निर्णय - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कानपूरस्थित पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला नवीन कर्ज घेण्यापासून आणि पुढील सहा महिन्यांपर्यंत ठेवी स्वीकारण्यास केला प्रतिबंध.

पेट्रोलच्या दरात ५७ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५९ पैसा वाढ करण्याचा तेल कंपन्यांचा निर्णय .

आपत्काळात पोलिसांचं तातडीनं सहाय्य मिळावं यासाठी राज्यातल्या ५ महानगरांमध्ये ११२ हा एकल आपत्कालीन सहाय्य क्रमांक सुरू, सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे इथल्या मिळेल मदत .

अभियांत्रिकी आणि एकंदर सर्व शैक्षणिक संस्था अशा दोन्ही वर्गवारीत,मद्रास आयआयटीनं यंदाही पटकावला प्रथम क्रमांक, विद्यापीठांच्या क्रमवारीत बंगळूरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेनं, व्यवस्थापन प्रकारात अहमदाबाद इथल्या आयआयएमनं तर वैद्यकीय शिक्षणप्रकारात एम्सनं पहिला क्रमांक पटकावला.

कामगारांच्या वेतन देयकाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घडवून आणण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावे आणि त्यासंदर्भातला अहवाल कामगार आयुक्तांना सादर करावा- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

टाळेबंदीच्या काळत कामगारांचं वेतन कापणाऱ्या कंपन्यांविरोधातल्या कारवाईला जुलै अखेरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाची बंदी, तडजोडीसाठी राज्य सरकारनं प्रयत्न करण्याची सूचना .

Post a Comment

Previous Post Next Post