अंबिजळगाव मधे जनता बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

अंबिजळगाव मधे जनता बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 

प्रतिनिधी २६/जुन ----दिलीप अनारसे------ कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव मधे कोरोनाच्या महामारीपासुन जनतेचे संरक्षण व्हावे तसेच कोरोनाला लागाम लागावा या पार्शवभुमीवर खबरदारी म्हणून अंबिजळगाव मधे गुरुवारी संपुर्ण गाव बंद ठेवले होते तर आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता, दिवसभर गावात शुकशुकाट दिसुन आला होता .कर्जत तालुक्यातिल राशीन येथे पहिला कोरोनाचा रुग्न आडळुन आला तर दुसरा रुग्ण कर्जत तालुक्यातील आळसुंदा येथील ६५वर्षीय महीलेला कोरोनाची लागन झाल्याने आळसुंदा ते अंबिजळगाव हे अंतर चार किलोमिटरचे आहे. म्हणून अंबिजळगावचे उपसरपंच महेश मोरे .गावचे पोलीस पाटील बिभीषन अनारसे.गावातील किराणा दुकानदार चंदु कुदळे.संजु भांडवलकर.तात्या निकत, कुमारशेठ अनारसे.अनिल निकत यांनी पुढाकार घेऊन एक दिवस  गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसा गावातील नागरिकांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतीसाद दिला...
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क 8329865383 

Post a Comment

Previous Post Next Post