ब्रेकिंग न्यूज : यंदाची पंढरपूर वारी रद्द पण...


Pune: कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर या वर्षी पहिल्यांदा आषाढी वारीचा पालखी सोहळा हा रद्द करण्यात आलेला आहे हा अत्यंत मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा सोहळा आज इतिहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागत आहे.

मात्र शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या मात्र माउली आणि इतर संतांच्या पादुका या विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे.

त्या कशा न्यायच्या याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये लवकरात लवकर हा निर्णय देखील कळविला जाणार आहे.

पादुका पंढरपुरात पोहोचवणं हा निर्णय माझा असेल माझी जबाबदारी असेल असं उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी ग्वाही दिली आहे.

आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे वारकरी संप्रदायाच्या वतीने आज महाराष्ट्रातून तब्बल दहा लाख भाविक पायी चालत पंढरपूरला जात असतात परंतु महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post